गरिबांच्या खिशातील पैसा काढून अतिश्रीमंतांना दिला जातोय – राहुल गांधी

मुंबई: केंद्रातील मोदी सरकार देशातील श्रीमंतांसाठी काम करत, त्यांची हजारो कोटींची कर्ज माफ केली जात आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती घसरल्या असतानाही पेट्रोलचे भाव वाढत आहेत. या वाढलेल्या भावामुळे गरिबांच्या खिशातील पैसा काही १५ – २० अतिश्रीमंत लोकांच्या खिशात पोहचवला आज असल्याची टीका कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी हे सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत, या दरम्यान पत्रकार परिषद घेत त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे .

आम्ही पेट्रोल जीएसटीमध्ये आणण्याची मागणी करत आहोत , मात्र पंतप्रधान त्यासाठी इंटरेस्ट नाहीत. देशातील सर्व विरोधीपक्ष भाजप आणि आरएससविरोधात एकवटले आहेत. केवळ राजकीय पक्षच नाही तर जनतेमध्येही सरकारविरोधी तीव्र भावना दिसून येत असल्याच राहुल गांधी यावेळी म्हणाले.