Share

Rahul Gandhi | “भाजपाने देशात द्वेष, भीती, दहशत आणि हिंसेचा प्रसार केला”; राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi | शेगाव : काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेच्या शेगावमधील सभेत भाजपावर जोरदार हल्ला टीका केली आहे. भाजपने देशात हिंसा, द्वेष , दहशत आणि भीतीचा प्रसार केला असल्याचा आरोप त्यांनीं केलाय.

ते म्हणाले, “विरोधी पक्षानं प्रश्न विचारला की, यात्रेची आवश्यकता का आहे? देशातील प्रत्येक भागात भाजपनं हिंसा पसरविली. भीती पसरविली आहे. या विरोधात ही यात्रा सुरू केली. यात्रेचा अर्थ तुमचं म्हणणं ऐकणं आहे.” तुमचं दुःख समजून घेण्याचा आहे. नफरतीमुळं लोकं तुटतात. पण, प्रेमातून लोकं जुळतात, असंही राहुल गांधी यावेळी सभेत बोलताना म्हणाले.

“आज देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपाने द्वेष, भीती, दहशत आणि हिंसेचा प्रसार केला आहे,” असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला. तसेच द्वेषाने या देशाचा कधीच फायदा होणार नाही, अशीही टीका त्यांनी यावेळी केलीय.

पुढे ते म्हणाले, या भागात गेल्या सहा महिन्यात कितीतरी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यामागचं कारण काय. कोणत्याही शेतकऱ्याशी बोला. ते सांगतात, योग्य भाव मिळत नाही. विम्याचे पैसे भरले. एक रुपया मिळाला नाही. शेतकरी आत्महत्या का करतो. ५० हजार रुपये, एक लाख रुपयांचं कर्ज असते म्हणून.” मग व्यापाऱ्यांचे पैसे कसे माफ होतात?  शेतकऱ्यांचे का माफ होत नाहीत?, असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला.

महत्वाच्या बातम्या :

Rahul Gandhi | शेगाव : काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेच्या शेगावमधील सभेत भाजपावर …

पुढे वाचा

Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now