ते जिथे जातील तिथे अवास्तव आश्वासनं देतात – राहुल गांधी

नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा: मोदीजी अनेक ठिकाणी जात असतात, त्याठिकाणी २-३ आश्वासन देतात आणि निवडणुकीनंतर सोयीस्करपणे विसरुनही जातात. ते जिथे जातील तिथे अवास्तव आश्वासनं देतात अशी टीका कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

त्रिपुरा येथे 18 फेब्रुवारीला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. आज याठिकाणी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्रिपुरामध्ये ६० जागांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 3 मार्चला जाहीर होणार आहे.