fbpx

आता देशाचे चौकीदार कुठं गेलेत ? – राहुल गांधी

नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा: देशाचे चौकीदार म्हणवणारे आता कुठे गेले असा प्रश्न विचारात राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष केल आहे.

‘आधी ललित मोदी, नंतर विजय मल्ल्या आणि आता नीरव मोदी प्रकरण उघड झालं आहे. पण ‘न खाऊँगा, न खाने दूँगा’, चं काय झालं?’ असं ट्विट राहुल गांधींनी केलं आहे.

‘११ हजार कोटींचा घोटाळा करून नीरव मोदीनं परदेशात पळ काढलाय तरीही पंतप्रधान यावर काहीही बोलायला तयार नाहीत’, असंही राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.