मी मोदींना फक्त ‘चौकीदार’ म्हणतो पण जनताच त्यांना ‘चोर’ म्हणते – राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : मी मोदींना फक्त ‘चौकीदार’ म्हणतो पण जनताच त्यांना ‘चोर’ म्हणते, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मोदी राफेल विमानाच्या व्यवहारात समांतर वाटाघाटी करत होते, असं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलं असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, असं म्हणत राहुल गांधीनी राफेलमुद्द्यावरून पुन्हा मोदींवर निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावर पुन्हा विराजमान होणार नाहीत, यामुळे त्यांच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. म्हणून ते माझ्यावर वेगवेगळे आरोप करत आहेत, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारतीयांनी मोदींच्या हातात सत्ता देऊन विश्वास दाखवला. मात्र मोदींनी देशांतील जनतेच्या भावनांचा आदर केला नाही, असा घणाघात राहुल गांधींनी केला आहे.