fbpx

निवडणूक आयोगाची भूमिका पक्षपाती, राहुल गांधींची टीका

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषदेला का सामोरे जात नाहीत, असा प्रश्न विरोधकांकडून गेली पाच वर्षे कायम विचारला जात असतानाच शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भाजप अध्यक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीमध्ये पक्षाच्या मुख्यालयात एक पत्रकार परिषद घेतली. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आणि भाजपवर टीकास्त्र सोडले.

१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्याच्या प्रचाराची सांगता होत असताना राहुल गांधी यांनी दिल्लीत ही पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाची भूमिका ही पक्षपाती होती, हे दुर्दैवाने म्हणावे लागेल. किंबहुना निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रमच नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी आखण्यात आला होता, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. नरेंद्र मोदी जे हवं तो बोलून जातात, इतर कोणी बोललं तर त्याला टोकलं जात. आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेऊ शकतो त्यापेक्षा जास्त काही करु शकत नाही असंही यावेळी राहुल गांधींनी सांगितलं.