मध्य प्रदेशात कॉंग्रेसची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना १० दिवसांच्या आत कर्जमाफी – राहुल गांधी

मंदसौर – मध्य प्रदेशमध्ये आम्ही सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना सुरक्षित करणे हे आमचे पहिले काम असेल. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार आले तर १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु अशी घोषणा राहुल गांधी यांनी आज मंदसौरमध्ये केली. मागच्यावर्षी मध्य प्रदेशात मंदसौर येथे झालेल्या गोळीबारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची राहुल यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणले की, काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास १० दिवसात न्याय मिळेल. ज्यांनी शेतकऱ्यांवर गोळया चालवल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करुन दाखवू . पंतप्रधान मोदींनी पंधरा उद्योगपतींचे १.५ लाख कोटींचे कर्ज माफ केले. पण मी त्यांना शेती कर्ज माफ करायला सांगितले त्यावर ते मौन होते. अशी टीका देखील राहुल गांधी यांनी यावेळी केली.