आम्ही मोदींच्या चुकांकडे बोट दाखवतो. मात्र पंतप्रधान पदाचा अनादर करत नाही

टीम महाराष्ट्र देशा: आम्ही भाजप आणि मोदींच्या चुकांकडे बोट दाखवतो. मात्र पंतप्रधान पदाचा अनादर करत नाही. तर नरेंद्र मोदी हे विरोधात असताना पंतप्रधानांचा अपमान करायचे, म्हणत कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर टिका केली आहे. राहुल गांधी यांनी बनासकांठामध्ये पक्षाच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या सोशल मीडिया टीममधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

सध्या गुजरात विधानसभेसाठीच्या प्रचाराने जोर धरला आहे. मैदानावरील प्रचारा सोबतच सोशल मिडीयावर देखील भाजप विरुद्ध कॉंग्रेसचा सामना रंगला आहे. पुढे बोलताना पंतप्रधान मोदींना टोला लगावत ‘ कॉंग्रेसकडे सोशल मिडिया प्रचाराची धुरा सांभाळनारी तीन ते चार जणांची टीम आहे. मी त्यांना काही सूचना देतो. मात्र मी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत बसत नाही’ अशी टिका त्यांनी केली आहे.