प्रिय मोदी भक्तांनो तुमच्या नेत्यांना गरजेच्या गोष्टींवर लक्ष देण्यास सांगा-राहुल गांधी

-modi-and-rahul-gandhi

टीम महाराष्ट्र देशा: प्रिय मोदी भक्तांनो तुमच्या नेत्यांना केवळ पोकळ घोषणा देण्यापेक्षा गरजेच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला सांगा, तसच चीन भारतासमोर स्पर्धा निर्माण करत असताना तुमचे नेते केवळ पोकळ घोषणाच देत आहेत. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ बघा आणि मोदींना रोजगार निर्मितीसारख्या आवश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला सांगा. याचबरोबर स्मार्ट सिटीच्या उपक्रमासाठी तरतूद करण्यात आलेल्या ९,८६० कोटींपैकी केवळ ७ टक्केच निधी आतापर्यंत खर्च करण्यात आल्याचे ट्विट करून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाना साधला आहे.

या ट्विट मध्ये हार्डवेअर उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेली चीनमधील सिलिकॉन व्हॅलीची बाजारपेठ दाखवण्यात आली आहे. येथे नव्या उद्योजकांना व्यवसाय उभारणीसाठी कशी मदत केली जाते हे दाखवलं आहे त्याचबरोबर हे ट्विट करताना राहुल गांधींनी #BJPEmptyPromises हा टॅग वापरून सरकारवर टीका केली आहे.Loading…
Loading...