‘नरेंद्र मोदी आणि अमित शहांना फक्त ‘दबंग’ मायावतीच रोखू शकतात’ : जयप्रकाश सिंह

टीम महाराष्ट्र देशा- भाजप विरोधकांना एकत्र आणून महाआघाडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या सरकार स्थापनेत मायावतींनी मोलाची भूमिका निभावली होती. राष्ट्रीय राजकारणात मायावतींनी छाप पाडली असून नरेंद्र मोदी आणि अमित शहांना फक्त ‘दबंग’ मायावतीच रोखू शकतात असं वक्तव्य बसपा नेते जयप्रकाश सिंह यांनी केलं आहे.

… तर मायावतींनी भाजपला पाठींबा द्यावा – रामदास आठवले

बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुरु असून या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत पक्षाचे धोरण काय असेल, यावर चर्चा झाली. पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक वीर सिंह आणि जयप्रकाश सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी मायावतींचे नाव पुढे केले.

सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून पैशाचा वापर

मायावती फक्त दलित समाजाच्या नेत्या नाहीत, त्यांना समाजातील प्रत्येक वर्गाचा पाठिंबा आहे, असेही ते म्हणालेत. राहुल गांधी हे त्यांच्या आईसारखेच दिसतात. त्यांची आई परदेशी असून यामुळे राहुल गांधी देखील पंतप्रधान होऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. मायावतींचा तळागाळातील जनतेशी संपर्क असून त्या चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीदेखील होत्या. त्यामुळे पंतप्रधानपदावर काम करण्याची क्षमता मायावतींमध्येच आहे, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघच हिंदू दहशतवादासाठी जबाबदार- दिग्विजय सिंह