fbpx

राहूल गांधींनी बोलावली नेत्यांची बैठक; विधानसभा निवडणुकांची रणनीती ठरणार

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु हा राजीनामा मागे घ्यावा, यासाठी काँग्रेसचे अनेक नेतेमंडळी प्रयत्न करत होते. परंतु आता त्यांनी नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रीय होताना दिसत आहेत.

आगामी काळात ज्या ज्या राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत, त्या त्या राज्यातील नेत्यांची बैठक नवी दिल्ली येथे होणार आहे. यात महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक २६ जून, हरयाणामधील २७ जून तर दिल्लीतील नेत्यांची बैठक २८ जून रोजी घेण्यात येणार आहे. या बैठकांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे.

दरम्यान, या बैठकीनंतर प्रदेश नेतृत्वात बदल होणार की नाही हे स्पष्ट होणार असून काही नवीन नेत्यांचा काँग्रेस कार्यकारणीमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर असल्याने या बैठीकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.