fbpx

राहुल गांधी स्वत:ला सुप्रीम कोर्टापेक्षाही मोठे समजत आहेत का?

टीम महाराष्ट्र देशा– सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष सुप्रीम कोर्टापेक्षाही स्वत:ला मोठे समजत आहेत का?, असा सवाल करत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे.

राफेल व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा कोणताही पुरावा नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मोदी सरकारला क्लीनचीट दिली. पण राफेल व्यवहारात भ्रष्टाचार झालाच आहे असा दावा राहुल गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मित्र अनिल अंबानींना मदत केल्याचा मी सिद्ध करुन दाखवीन असे राहुल म्हणाले.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष सुप्रीम कोर्टापेक्षाही स्वत:ला मोठे समजत आहेत का? असा सवाल करत राहुल यांचा संवैधानिक संस्थांवर विश्वास राहिलेला नाही असं प्रसाद म्हणाले.