लोकसभेत राफेल वरून घमासान ; राहुल गांधींचा भाजपवर जबरदस्त हल्लाबोल

टीम महाराष्ट्र देशा : राफेल घोटाळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार आहेत. त्यांना आपली जबाबदारी झटकता येणार नाही असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केला. लोकसभेत आज राफेल प्रकरणावर चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चेदरम्यान प्रचंड गदारोळ झाला. या प्रकरणातली ऑडिओ क्लिप लोकसभेत ऐकवली पाहिजे अशी मागणी राहुल गांधींनी केली.

राहुल यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

राफेल प्रकरणावर सर्व देश पंतप्रधानांच्या भूमीकेवर संशय व्यक्त करतोय. त्यांनी एकाही प्रश्नाचं नीट उत्तर दिलं नाही – राहुल गांधी

पंतप्रधानां सर्वांसमोर येवून बोलण्याची हिंम्मत नाही.

राफेलचा जुना करार बदलून नवा करार का करण्यात आला. फक्त 36 विमानं खरेदी करण्याचा करार का करण्यात आला?

राफेलच्या किंमती का वाढल्या. काही कंपन्यांनाच का निवडलं या सर्व प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागतील – राहुल गांधी

राफेल कराराबाबतची महत्त्वाची फाईल माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडे आहे, असा दावा करत काँग्रेसने एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. जारी केलेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये गोव्यातील भाजपचे मंत्री विश्वजीत राणे यांनी एक मोठा खुलासा केला आहे, असंही काँग्रेसचं म्हणणं आहे.