भाजप- संघाचा ‘डीएनए’च दलितविरोधी आहे- राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा- ‘भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दलितांची नेहमीच उपेक्षा केलीय. त्यांचा ‘डीएनए’च दलितविरोधी आहे,’ असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. अॅट्रॉसिटी कायद्याबाबतच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात आज दलित संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

काय म्हणाले राहुल गांधी ?
‘दलितांनी कायम मागास राहावे, हीच संघ व भाजपची भूमिका आहे. संघ, भाजपच्या या विचारांना आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचं बंड हिंसाचार घडवून मोडून काढलं जातं,’ असं राहुल म्हणाले. ‘हजारो दलित बांधव आज रस्त्यावर उतरून मोदी सरकारकडे त्यांच्या अधिकारांच्या सुरक्षेची मागणी करत आहेत. त्यांना माझा सलाम आहे,’ असंही राहुल यांनी ट्विटमध्ये पुढं म्हटलंय.

लोकांनी कायदा हातात घेतल्यास परिणाम भयंकर होतील : प्रकाश आंबेडकर
आज जो भडका उडाला आहे त्याला सुप्रीम कोर्ट आणि शासनच जबाबदार असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केला आहे. सामान्य जनतेला विचारात न घेता निर्णय घेतल्यामुळे आज हे सर्व घडत आहे.देशात सीरिया सारखं वातावरण निर्माण होतअसून देशात आज काही ठिकाणी हिंसाचार झाला त्याला सर्वस्वी सुप्रीम कोर्ट जबाबदार.शासनाने यामध्ये हस्तक्षेप करण्याची गरज असून जर हस्तक्षेप केला नाही तर लोकांनी कायदा हातात घेतल्यास परिणाम भयंकर होतील आणि त्यास शासनच जबाबदार असेल असा इशारा देखील आंबेडकर यांनी दिला .

You might also like
Comments
Loading...