‘कोरोना’ ही भारतासाठी धर्म, जाती आणि वर्गाचे मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची संधी

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात कोरोना रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे आता नागरिकांमध्ये घबराट आहे. तसेच  दिल्लीतील तबलिगी जमातच्या मरकजमध्ये सापडलेल्या कोरोना रुग्णांमुळे समाज माध्यमांत मोठ्या प्रमाणात संदेश फिरत आहे. त्यामुळे समाजात धर्माच्या नावावर दुही निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्वीट करून देशातील जनतेला आपले धर्म , जात , आर्थिक स्थिती सगळ विसरून एकत्र येण्याच आवाहन केलं आहे. आपण सगळे एकत्र येऊन कोरोना महामारीला हरवू असं आवाहन त्यांनी केलं आहे. ते म्हणाले,

#कोरोनाव्हायरस ही भारतासाठी धर्म, जाती आणि वर्गाचे मतभेद बाजूला ठेवून एक लोक म्हणून एकत्र येण्याची संधी आहे; एक समान हेतू बनविणे: या प्राणघातक विषाणूचा पराभव. करुणा, सहानुभूती आणि आत्मत्याग ही या कल्पनेची मुख्य भूमिका आहे. एकत्रितपणे आपण ही लढाई जिंकू.’

हेही पहा –