आघाडीबाबत राहुल गांधी आणि शरद पवार यांची दिल्लीत होणार बैठक- अशोक चव्हाण

मुंबई: काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत एप्रिल महिन्यात राहुल गांधी आणि शरद पवार यांची दिल्लीत बैठक होणार असून या बैठकीआधी महाराष्ट्र काँग्रेस आपला अहवाल राहुल गांधी यांना देणार असल्याचे कॉंग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकांमध्ये रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलनाचा हत्यार उपसले आहे. सध्या या आंदोलनाचा चौथा टप्पा सुरु आहे. काँग्रेसने सुद्धा निवडणुकीची तयारी सुरू केली असून सर्व २८८ जागांचा आढावा घेतला जात आहे. अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

यापूर्वी नरेंद्र मोदींना मात देण्यासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र येणार असल्याच्या गप्पा रंगल्या होत्या. दरम्यान, राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

You might also like
Comments
Loading...