राहुल गांधी आणि नितीन गडकरींच्या चर्चेची सोशल मिडीयावर चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : देशाच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीतील राजपथावर सैन्यदलाच्या संचलनाचं आयोजन करण्यात आलं होत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आमंत्रित करण्यात आलेले प्रमुख पाहुणे सिरील रामाफोसा यांच्यासह राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या उपस्थितीत संचलनाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली होती. यावेळी उपस्थितांमध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व भाजपचे नेते तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे शेजारी शेजारी बसले होते.त्यावेळी त्यांच्यामध्ये बऱ्याच गप्पा रंगल्या.त्यावरून सोशल मिडीयावर त्यांच्या चर्चेची चर्चा चांगलीच रंगतेय.

प्रजासत्ताक दिनानिमित राजपथावर सैन्यदलाच्या संचलनाच्या या कार्यक्रमात उपस्थितीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व भाजपचे नेते तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा फोटो व्हायरल होत आहे.त्या फोटोत बाजूला अमित शहादेखील दिसत आहेत.त्यामुळे सोशल मिडीयावर सध्या हे दोघे चर्चेचा विषय बनले आहेत.