गोव्यात राहुल गांधी आणि मनोहर पर्रिकरांची भेट ; राजकीय चर्चांना उधान

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी गेली २ दिवस गोवा दौर्यावर आहेत. आज त्यांनी गोवा विधानसभेत येऊन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या तब्बेतीची चौकशी केली. त्यांनी यावेळी पर्रिकरांना ‘लवकर बरे व्हा’ असे म्हणत सदिच्छाही व्यक्त केली.याबाबत खुद राहुल गांधी यांनीच या भेटीचं ट्विट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी पर्रिकरांकडे राफेल प्रकरणी महत्वाची माहिती आहे, असा दावा केला होता. त्यानंंतर आता राहुल गांधीनी पर्रिकरांची भेट घेतल्याने वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

या भेटीबाबत राहुल गांधी ट्वीट मध्ये म्हणाले,आज सकाळीच मी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो. ही सदिच्छा भेट होती. त्यानंतर विरोधी पक्षाचे नेते चंद्रकांत कवळेकर यांनीही या भेटीची माहिती दिली. ‘ही भेट अत्यंत खासगी आणि अवघ्या पाच मिनिटांची होती. राफेलच्या ऑडिओ टेप संबंधी कुठलीही चर्चा झाली नाही,’ असं ते म्हणाले. पर्रिकरांच्या भेटीनंतर राहुल यांनी काँग्रेसच्या आमदारांचीही भेट घेतली. यावेळी लवकरच राजकीय भेटीवर गोव्यात येणार असल्याचे त्यांनी काँग्रेस आमदारांना सांगितले.

सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार राहुल गांधी यांची भेट सदिच्छा होती. तब्बेत ठीक देखील तुम्ही ही सगळी कामे कशी करता? असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. त्यावर पर्रिकर म्हणाले, ‘आपला हा स्वभाव असून आपण जे ठरवतो ते करतो त्यामुळे आपल्याला त्याची सवय झाली आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या आई युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वतीनेही शुभेच्छा दिल्या व दिल्ली मधील प्रदूषणाला कंटाळून आपण हवा पालट करण्यासाठी गोव्यात अधून मधून येत असल्याचे सांगितले.