राधाकृष्ण विखे पाटलांचा राजीनामा स्वीकारला ; अशोक चव्हाणांची माहिती

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यातील प्रचार सुरू असताना नगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वीकारला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

याआधी नगरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष करण ससाने यांनीही पदाचा राजीनामा दिला. राहुल गांधींची शुक्रवारी शिर्डी मतदारसंघासाठी संगमनेरमध्ये सभा आहे, त्यापूर्वीच काँग्रेसला दोन धक्के बसले आहेत. त्यामुळे राज्यात कॉंग्रेसला हा जबर धक्का आहे.Loading…
Loading...