हिवाळी अधिवेशनाला सलग दुसऱ्या दिवशीही राहुल गांधीनी मारली दांडी

blank

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीत हिवाळी अधिवेशनाला  सुरवात झाली आहे. यात काल नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर प्रश्नोत्तारच्या वेळी महाराष्ट्रातील नेत्यांनीही राज्यातील अवकाळी संकटाची माहिती लोकसभा अध्यक्षांना दिली. मात्र चर्चेचा विषय ठरला तो राहुल गांधींच्या अनुपस्थितीचा.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या लोकसभेतील अनुपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राहुल गांधी उपस्थित असते तर त्यांना प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारण्याची संधी मिळाली, असती असं अनुपस्थितीची दखल घेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले.

के. सुरेश हे राहुल गांधींच्या जागेवर येऊन प्रश्न विचारत होते. यावर ओम बिर्ला म्हणाले, ‘तुमची जागा रिक्त दाखवत आहे. ही राहुल गांधींची जागा आहे. राहुल गांधी सध्या सुट्टीवर आहेत. त्यामुळे तुम्ही तुमच्या जागेवर जावं.’ दरम्यान, सभागृहातील सर्व सदस्यांना त्यांच्याच जागेवरुन बोलण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजप खासदार राजीव प्रताप रुडी यांनी केली.

दरम्यान, काँग्रेस खासदार के. सुरेश हे राहुल गांधींच्या जागेवर येऊन शून्य प्रहरात प्रश्न विचारत होते. यावेळी एलईडी स्क्रीनवर राहुल गांधींचं नाव दिसलं. त्यामुळे के. सुरेश यांना स्वतःच्या जागेवर जाण्याची सूचना देण्यात आली. राहुल गांधी सभागृहात नसूनही त्यांचं नाव दिसत होतं.

महत्त्वाच्या बातम्या :