राहुल फटांगडे यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे पोलिसांकडून प्रसिद्ध

1 जानेवारी रोजी सणसवाडी आणि कोरेगाव भीमा येथे मोठी दंगल उसळली होती. यामध्ये अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती तर अनेक जण जखमी झाले होते. तर जमावकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात राहुल बाबाजी फटांगडे (वय.३१) याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

दरम्यान आता राहुल फटांगडे यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत.या आरोपींच्या संदर्भात माहिती देण्याचं आव्हान पोलिसांनी स्थानिक नागरिकांना केलं आहे.या आधी तीन आरोपींना अटक करण्यात आले असून, अद्याप ४ आरोपींचा तपास सुरु असल्याचंही  पोलिसांच्या वातीनं सांगण्यात आलं.

You might also like
Comments
Loading...