राहुल द्रविड घेणार शास्त्रींची जागा; सौरव गांगुलीने दिले मोठे संकेत

ganguli

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री लवकरच संघ सोडणार आहेत. यावर्षी, आयसीसी टी -20 विश्वचषक भारताने आयोजित केलेल्या यूएईमध्ये आयोजित केले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षक म्हणून शास्त्रींची ही शेवटची स्पर्धा असेल.  यावर्षी खेळल्या जाणाऱ्या आयसीसी टी -20 विश्वचषकानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करार पुढे वाढवण्यास शास्त्री उत्सुक नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे टी 20 विश्वचषकानंतर टीम इंडिया मोठे बदल होणार हे निश्चित आहे. तसेच शास्त्री यांची जागा घेण्यासाठी टीम इंडियाची ‘वॉल’ राहुल द्रविडचं नाव चर्चेत होत. आता याचे संकेत BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीनेही दिले आहेत.

राहुल द्रविडला टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक करण्याबाबतचे संकेत खुद्द सौरव गांगुलीने दिले आहेत. दे टेलिग्राफशी बोलताना दादा म्हणाला, ‘आम्ही अजून द्रविडसोबत याबाबतीत चर्चा केलेली नाही. मी समजू शकतो की द्रविडला परमनंट मुख्य प्रशिक्षक होण्यात रस नाही. मात्र अजूनही आम्ही याबाबत कोणतीच चर्चा केलेली नाही. जेव्हा ही चर्चा करण्याचा विचार करु, तेव्हा पाहू, असं गांगुली यावेळी म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या