राहुल द्रविडचा ‘तो’ मेसेज ठरला निर्णायक; चहरला सांगितलेला कानमंत्र ठरला फायदेशीर

deepak chahar and rahul dravid

श्रीलंका : भारताची ‘युवा’ टीम सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला आहे. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली आहे.

भारताला विजयासाठी 276 धावांची गरज असताना पहिल्या आणि मधल्या फळीतील आघाडीचे बॅट्समन स्वस्तात माघारी परतले. 193 धावांवर सात विकेट्स असताना विजयाची आशा मावळली होती. हातात ३ विकेट्स असताना ८३ धावांची गरज होती. अशात दीपक चहर आणि भुवनेश्वर कुमारने केलेली भागीदारी ही निर्णायक ठरली. या दोन्ही खेळाडूंनी संयमी खेळी केली आणि श्रीलंकेच्या घशातून हा विजय खेचून आणला.

सध्या चर्चा होत आहे ती प्रशिक्षक राहुल द्रविड याने दीपक चहरला दिलेल्या महत्वाच्या मेसेजची. एकामागे एक फलंदाज बाद होत असताना सूर्यकुमार यादव (५२ धावा) आणि कृणाल पांड्या (३५ धावा) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते देखील बाद झाले. १९३ धावांवर ७ विकेट्स आणि मैदानात चहर आणि कुमार होते.

विजयासाठी मोठी खेळी करणं गरजेचं होतं. अशावेळी राहुल द्रविडने योग्य वेळी चहरसाठी एक संदेश पाठवला. “तुला शेवटपर्यंत खेळायचंय. सगळे बॉल खेळून काढ…” असा संदेश राहुलने चहरला दिल्यानंतर चहरने देखील हे लक्षात ठेवत संयमी खेळी केली. धावसंख्या वाढवण्यासोबतच विकेट न जाऊ देण्याचे आव्हान कुमार आणि चहरने योग्य पद्धतीने पार पाडले आणि संघासाठी महत्वपूर्ण विजय मिळवला. सामन्यानंतर चाहरने या विजयाचे श्रेय द्रविडला देऊन याबबाबत कबुलीच दिली.

महत्त्वाच्या बातम्या

IMP