Share

Rahul Dravid | राहुल द्रविडची क्रिकेट कोच कारकीर्द संपणार?, BCCI ने आखला नाव प्लॅन

Rahul Dravid | टीम महाराष्ट्र देशा: श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेने भारतीय संघ नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे. भारत आणि श्रीलंका (IND vs SL) या दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि एकदिवसीय मालिका मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळली जाणार आहे. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेमध्ये हार्दिक पांड्या (Hardik Pandya) भारतीय संघाचे कर्णधार पद सांभाळणार आहेत. दरम्यान, बीसीसीआय आणखी एक नवी योजना आखात असल्याची बातमी समोर आली आहे.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेमध्ये भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली या खेळाडूंचा समावेश आहे. बीसीसीआयने या नावाच्या घोषणेसोबतच टी-20 फॉरमॅटमध्ये बदल होण्याचे संकेत दिले आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये हार्दिक पांड्याला भारतीय संघाचा नियमित कर्णधार बनवल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कर्णधारासोबतच बीसीसीआय आता भारतीय संघाचा कोच देखील बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआय टी-20 फॉर्मेटमध्ये राहुल द्रविडच्या जागी पर्याय शोधत आहे. यामध्ये परदेशी प्रशिक्षकांचा देखील समावेश आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे की,”आम्ही विविध प्रकारचे पर्याय शोधत आहोत. सध्या आम्ही घरच्या मैदानावर होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी तयारी करत आहोत. कारण आपल्याला तो विश्वचषक जिंकायचा आहे. या कारणांमुळे टी-20 वर दुर्लक्ष होणार आहे. त्यामुळे टी-20 कोचमध्ये बदल केला जाऊ शकतो.

श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेमध्ये भारतीय संघामध्ये हार्दिक पांड्या (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या

Rahul Dravid | टीम महाराष्ट्र देशा: श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेने भारतीय संघ नवीन वर्षाची सुरुवात करणार आहे. भारत आणि श्रीलंका (IND …

पुढे वाचा

Cricket Sports