राहूल आवारेला लवकरच शासकीय नोकरीत सामावून घेवू – मुख्यमंत्री

कुस्तीपटू राहूल आवारे याची पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणली घडवून भेट

टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा बीडचा सुपूत्र कुस्तीपटू राहूल आवारे याची ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली.राहूलला लवकरच शासकीय नोकरीत सामावून घेवू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मुंडे यांनी ट्वीट करून दिली आहे.

गोल्डकोस्ट येथे खेळवण्यात येणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या राहुल आवारेने कुस्तीत पहिल्या सुवर्णपदकाची कमाई केली .५७ किलो वजनी गटात कॅनडाच्या स्टिव्हन ताकाहाशीवर मात करत राहुलने या स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.शेवटच्या फेरीत स्टिव्हन ताकाहाशीने राहुलला चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला, मात्र महाराष्ट्राच्या मातीत कुस्तीचे धडे गिरवलेल्या राहुलने स्टिव्हन ताकाहाशीचा डाव त्याच्यावरच उलटवत सुवर्णपदकावर आपलं नावं कोरलं.
दरम्यान आज कुस्तीपटू राहूल आवारे याची ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घडवून आणली.राहुलच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राची मान देशात उंचावली असून राहूलला लवकरच शासकीय नोकरीत सामावून घेवू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

You might also like
Comments
Loading...