‘पहिला मराठमोळा जागतिक कुस्ती पदक विजेता बनण्याचा मला अभिमान’

टीम महाराष्ट्र देशा:- कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत मराठमोळ्या राहुल आवारेने कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला आहे. जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा तो पहिला मराठी चेहरा ठरला आहे.

त्यानंतर राहुल आवरेंने आपली प्रतिक्रिया दिली आहे.जागतिक कुस्ती स्पर्धेत देशाला,महाराष्ट्रला पदक मिळवुन देत असताना पहिला मराठमोळा पदक विजेता मल्ल बनण्याची मला संधी मिळाली याच्या पेक्षा मोठा आनंद व अभिमान काय असु शकतो असे, म्हणत त्याने ट्विट करून भावना वक्त केल्या.

दरम्यान राहुल आवारेनं जागतिक कुस्ती स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. कझाकस्तानमध्ये सुरु असलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुलनं कांस्यपदकाची कमाई केली. या कामगिरीसह जागतिक कुस्ती स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिला मराठमोळा पैलवान ठरला. कांस्यपदकाच्या लढाईत राहुलनं ६१ किलो वजनी गटात अमेरिकेच्या टायलर ग्राफचं आव्हान मोडीत काढलं. त्यानं ही लढत 11-4 अशी जिंकली.

महत्वाच्या बातम्या