राहुल आणि प्रियांका गांधी यांना अनुभव नसून, दोघेही दिशाभूल झालेले नेते; कॅप्टन बरसले

aamrinder singh

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आपले मुख्यमंत्री विविध राज्यांमध्ये बदलले. मात्र ज्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले त्यांनी बंडखोरीची भाषा केली नाही. पंजाबमध्ये आता काँग्रेसला कॅप्टन बदलावा लागला. अमरिंदर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा लागला, पण सिंग यांनी मुकाट्याने पद सोडले नाही. त्यांनी आता काँग्रेसविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेली आहे.

आता अमरिंदरसिंग यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्यानंतर थेट गांधी कुटुंबावरच हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना अनुभव नसून, दोघेही दिशाभूल झालेले आहेत, अशी टीका अमरिंदरसिंग यांनी केली आहे. त्यामुळे अमरिंदरसिंग यांनी थेट गांधी कुटुंबावर निशाणा साधल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ते लवकरच काँग्रेस सोडतील, या शक्यतेला आता बळ मिळू लागले आहे.

दरम्यान चरणजितसिंग चन्नी यांनी नुकतीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी हेही या शपथविधीला उपस्थित होते. त्यांनी चन्नी यांची निवड करत दोन गटांमध्ये विभागलेल्या पंजाब काँग्रेसमधील मतभेदांवर जालीम उपाय केल्याचे बोलले जात आहे. परंतु शपथविधीला अमरिंदरसिंग यांची दांडी मारली होती. त्यामुळे पंजाब काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते.

महत्त्वाच्या बातम्या