‘मी शाळा शिकलेली नाही,माझी शाळा काळ्या मातीमध्ये झालेली आहे’

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त काल विद्यापीठामध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं.

ग्रामविकासाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे पोपटराव पवार, आणि बीजमाता राहिबाई पोपरे, त्याचबरोबर ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आणि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव, भटक्या-विमुक्तांच्या विकासासाठी कार्यरत असलेले गिरीश प्रभुणे, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के. जैन आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य उभारणारे डॉ. विनोद शहा या सहा जणांना “जीवनसाधना गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला.

Loading...

राहीबाई पोपरे यांनीही यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. मी तसं शाळा शिकलेली नाही, एकही दिवस शाळेला गेलेली नाही पण मी काय बोणारे तसं, पण माझी शाळा म्हटला तर ह निसर्गाच्या कुशीमध्ये झालेली आहे,माझी शाळा काळ्या मातीमध्ये झालेली आहे, काळ्या आई बरोबर झालेली आहे,गेल्या वर्षी नारीशक्ती पुरस्कार घेतला आता पद्मश्री पण पद्मश्री पुरस्कार मी म्हणते माझा नाहीये माझ्या काळ्या मातीचा आहे, माझ्या आईचा आहे आणि पद्मश्री म्हणला तर तुमच्या आमच्या सर्वांचा माझ्या महाराष्ट्राचा पुरस्कार आहे.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना पोपटराव पवार म्हणाले. देशामध्ये ३५० जिल्हे आणि जवळ जवळ 8 हजार गावं आणि 12 राज्य आज पाण्याचा संघर्ष करत आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवर हिवरेबाजार च्या ग्रामस्थांनी गेले 30 वर्ष जे एकत्र येऊन काम केले आहे,आणि त्यांच्या ह्या प्रामाणिक प्रयत्नाला सर्व शासकीय यंत्रणेने राजकीय व्यवस्थेने या सर्वांनी जे सकारात्मक पाठबळ दिलं आहे,याच माध्यमातून आज भू–जल व्यवस्थापनाचा गौरव म्हणजे आजचा पद्मश्री पुरस्कार आहे.

डॉ. नरेंद्र जाधव, यावेळी बोलताना म्हणाले,हा पुरस्कार देण्याची प्रथा चालू केल्यानंतर आजवर विद्यापीठाच्या किमान ३ माजी कुलगुरूंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे,डॉ. देवदत्त दाभोळकर, डॉ.राम ताकवले आणि डॉ.गोवारीकर या दिग्गजांच्या मांदियाळीमध्ये माझा समावेश करण्यात आला याचा मला विशेष आनंद वाटतो.याच कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू केदार जाधव, प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि युवा नाटककार धर्मकिर्ती सुमंत यांना “युवा गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. केदार जाधव सध्या न्यूझिलंडच्या दौऱ्यावर असल्याने त्याच्या वतीनं कुटुबीयांनी हा पुरस्कार स्वीकारला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
घ्या आता ! इंदुरीकर म्हणाले, मी असं बोललोच नाही
शरद पवार होणार निवृत्त ? पुन्हा राज्यसभेबाबत सस्पेन्स कायम
म्हणून नारायण राणे यांचा जळफळाट होतोय, शिवसेनेचा ढाण्या वाघ राणेंवर गरजला
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
चुकीला माफी नाही ! आदित्य ठाकरे यांनी केले दिल्लीतील 'त्या' अधिकाऱ्याला निलंबित
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
एकनाथ खड्सेंचे निर्दोषत्व सिद्ध झाल्यास ; फडणवीस यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ?
'तृप्ती देसाईंवर अश्लील टीका इंदुरीकरांच्या सूचनेनुसारच' ; तासगावात तक्रार