‘एनडीएमध्ये लवकरच खळबळ उडणार’

amit_shah

पटना : बिहारमध्ये सत्तेत असणाऱ्या एनडीएमध्ये लवकरच खळबळ उडणार आहे. अनेक आमदार पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत असा दावा राजदचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनी केला आहे. अमित शाह यांच्या बिहार दौऱ्यानंतर भाजप आणि जेडीयूमध्ये जागावाटपाचा तिढा सूटला असल्याचा दावा देखाल खोटा असल्याचं म्हटलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये सत्तेत असलेल्य़ा भाजप आणि जेडीयूच्या प्रमुखांमध्ये बैठक झाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि नीतीश कुमार यांच्यात झालेल्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीबाबत जागा वाटपाचा फॉर्म्यूला देखील ठरल्याचा दावा केला जात आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी देखील दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र मिळून काम करण्याचं आवाहन केलं आहे.

नेमकं काय म्हणाले रघुवंश प्रसाद सिंह ?
”एनडीएमध्ये लवकरच खळबळ उडणार आहे. एनडीएमध्ये फक्त भाजप एकटाच पक्ष उरणार आहे. शिवसेना देखील नाराज आहे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्रबाबू नायडू देखील एनडीएमधून बाहेर पडले आहेत. अशीच गोष्ट बिहारमध्ये देखील होऊ शकते. अमित शाह यांच्या बिहार दौऱ्यानंतर भाजप आणि जेडीयूमध्ये जागावाटपाचा तिढा सूटला असल्याचा दावा देखाल खोटा आहे ”