fbpx

नोबेल पुरस्कारासाठी रघुराम राजन यांचे नाव संभाव्य यादीमध्ये

raghuram-rajan

टीम महाराष्ट्र देशा : रिझर्व्ह बँकचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या संभाव्य यादीत समावेश करण्यात आला आहे. क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्स या संस्थेने नोबेल पुरस्काराच्या संभाव्य विजेत्यांची यादी तयार केलीय त्यात रघुराम राजन यांचं नाव आहे.अर्थशास्त्र नोबेल पुरस्कारांच्या यादीत त्यांचा समानेश केला गेलाय.

क्लॅरेवेट अॅनॉलिटिक्स अॅकॅडमी ही एक संशोधन संस्था असून त्यांनी जगभरातल्या 6 अर्थतज्ज्ञांची यासाठी निवड केलीय. कॉर्पोरेट वित्त क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल राजन यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.