नरेंद्र मोदींच्या मतांशी रघुराम राजन असमहत

raghuram rajan &pm

टीम महाराष्ट्र देशा: मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कारभाराला लोकशाही म्हणता येईल का ? असा गंभीर प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी उपस्थित केला आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलं आहे.

राजन म्हणाले, देशातील पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्यकर्त्यांनी निर्णयांच्या अंमलबजावणीवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या देशात प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून निर्णय घेतले जात नाहीत, ही चिंतेची बाब आहे. अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयांना महत्व  दिले जात नाही. आपल्याला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवले जाईल की काय, अशी भीती त्यांच्यात असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दावोस येथील आर्थिक परिषदेत जागतिक समुदायापुढे लोकशाही वातावरण आणि प्रगतीपथावर असलेला देश म्हणून भारताविषयी सांगितले तसेच पंतप्रधान मोदींनी दावोसमध्ये लोकशाही, भौगोलिकता आणि गतिमानता या तीन गोष्टी भारताच्या भविष्याला एकत्रितपणे आकार देत असल्याचे म्हटले होते. याच मार्गावरून भारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. त्यासाठी ‘सुधारणा, त्यांची अंमलबजावणी आणि त्यामधून होणारा कायापालट’ हा आमच्या सरकारचा त्रिसूत्री मंत्र असल्याचे मोदींनी सांगितले होते. मात्र मोदींच्या या मतांशी रघुराम राजन यांनी असमहती दर्शवली आहे.