‘भूंकणारे भूंकत राहतील पण महाराज आपण कीर्तन बंद करू नये’

शिर्डी : स्त्री संग समतिथीला केला तर मुलगा आणि विषमतिथीला केला तर मुलगी होते असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु असतानाच माध्यमांमध्ये सुरु असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे महाराज व्यथित झाल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु असतानाच त्यांनी या सर्व वादावर काल रात्री केलेल्या किर्तनात आपली प्रतिक्रिया दिली आहे.“दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन” असं इंदुरीकर म्हणाले आहेत. “यूट्यूबवाले काड्या करतात. यूट्यूब चॅनलवाल्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु सांगतो चॅनल संपतील पण मी नाही”, असंही इंदुरीकर महाराज म्हणाले. या किर्तनात इंदुरीकरांनी सर्व प्रकरणाचा रोष यूट्यूब चॅनलवर व्यक्त केला.

Loading...

एका बाजूला मिडिया तर दुसऱ्या बाजूला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीने महाराजांच्या विरोधात रान पेटविले आहे. दोन तासांच्या किर्तनात एखाद वाक्य चुकीच जावू शकत. मी बोललेल अनेक ग्रंथात नमुद आहे. असं स्पष्टीकरण इंदोरीकरांनी माध्यमांसमोर न बोलता पुन्हा एकदा आपल्या कीर्तनातून दिलं आहे.

तसेच यावर बोलताना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील म्हणाले की, इंदोरीकर महाराजांना शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी समर्थन दिलं आहे.इंदोरीकरांनी आपलं काम सुरू ठेवावं आम्ही आपल्या सोबत आहोत. भूंकणारे भूंकत राहतील पण आपण कीर्तन बंद करू नये. अशी विनंती ही रघुनाथ दादा पाटील यांनी केली आहे. AM न्यूज ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दरम्यान,तृप्ती देसाई यांनी पुन्हा एकदा महाराजांवर हल्लाबोल केला असून, आपला देश धर्मानुसार आणि पुराणानुसार चालत नाही. तो संविधानानुसार चालतो. इंदोरीकर महाराजांनी कीर्तन करायचे की, शेती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असल्याचे म्हंटल आहे.

मात्र शेती करताना तरी इंदोरीकर महाराजांनी शेतात कामासाठी येणाऱ्या महिलांसोबत व्यवस्थित बोलावे. त्यांनाही जर अपमानास्पद बोलाल तर स्वतःच्या शेतातही काही दिवसांनी काम करता येणार नाही. अशी तुमची गत होऊ शकते, अशी टीकाही यावेळी देसाई यांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ‘महाराष्ट्र देशा’ शी बोलताना इंदुरीकरांच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘ कोणताही कीर्तनकार, प्रबोधनकर आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला एक दिशा देत असतो. मात्र इंदुरीकर महाराज आपल्या प्रबोधनातून महिला मुलींवर उपहासात्मक आणि अपमानास्पद टीका करत असतात. आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. या परंपरेतून त्यांनी चांगले विचार समाजात रुजवायला पाहिजेत. मात्र प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी संतांचा विचार मांडला पाहिजे असं म्हटलं आहे.’

पुढे बोलताना त्या म्हणाल्या,तसेच इंदुरीकरांनी आपल्या कीर्तनातून स्त्री – जन्माचा विचार समाजात रुजवायला पाहिजे. त्याचबरोबर पुरुषांमध्ये हि स्त्रियांचा सन्मान आणि आदर राखण्याचा विचार मांडायला हवा. स्त्री जन्माची धुरा त्यांनी समाजात रुजवणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्यावर टीका झाली म्हणून त्यांनी कीर्तन सोडण्याची गरज नाही, असेही त्यांनी महाराष्ट्र देशा’ला यावेळी सांगितले आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका