यापूर्वी पाण्याचे राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांना कसे निवडून दिले, याचे विशेष वाटते : रघुनाथदादा

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता केली टीका

पुणे – यापूर्वी पाण्याचे राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांना कसे निवडून दिले, याचे विशेष वाटते, अशी अप्रत्यक्ष टीका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.महाराष्ट्र विकास केंद्र व ग्लोबल सेंटर फॉर वॉटर सायन्स रिसर्च अँड टेक्नॉलॉजी यांच्यावतीने जलमित्र पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले रघुनाथदादा ?
बऱ्यापैकी पाऊस होऊनदेखील राज्याच्या अनेक भागांमध्ये पाण्याचा तुटवडा जाणवतो. दरवेळी काही जिल्ह्यांमध्ये पाणी नाही, अशी ओरड होते. ज्या ठिकाणी पाणी मुबलक आहे तिथून ज्या भागात तुटवडा आहे तिथे पाणी पोहोचविणे शहाणपणाचे आहे. यापूर्वी पाण्याचे राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांना कसे निवडून दिले, याचे विशेष वाटते. बदलत्या काळानुसार पाण्याचा प्रश्न गंभीर होत असून त्याकरिता व्यापक चळवळ उभारणे गरजेचे आहे. पाण्याविषयी राजकारण व त्यावरून वाद घालून तो प्रश्न सुटण्याऐवजी आणखी भरकटत जाईल.