fbpx

मोदींचा ‘राफेल’मध्ये प्रत्यक्ष सहभाग , संरक्षणमंत्री खोटं बोलत असल्याचा राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्ली : राफेल मुद्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोन्ग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी बोलतांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘राफेल’मध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप केला आहे. संरक्षणमंत्री खोटं बोलत असल्याचंही ते म्हणाले. सुप्रीम कोर्टात सरकार खोट बोललं असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

नवी दिल्लीत राहुल गांधीनी पत्रकार परिषद घेतली. राफेल घोटाळा प्रकरणावर बोलण्यासाठीच त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. ‘हिंदु’ दैनिकाच्या वृत्ताचा आधार घेत मोदींवर राहुल गांधी यांनी टिकास्त्र सोडले.

राफेल डीलसाठी संरक्षण मंत्रालयाची फ्रान्स सरकारसोबत बोलणी सुरू होती. मात्र त्यात पंतप्रधान कार्यालयानं हस्तक्षेप केला. याचा फायदा फ्रान्सला झाला. पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या हस्तक्षेपाचा आणि समांतर वाटाघाटींचा संरक्षण मंत्रालयानं निषेधही नोंदवला होता, असं वृत्त ‘द हिंदू’नं आज प्रसिद्ध केलं. या वृत्ताच्या आधारे राहुल यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला.