fbpx

पुढच्या महिन्यात राफेल विमान भारतात दाखल होणार

टीम महाराष्ट्र देशा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यावर आहेत. पहिल्याच दिवशी जैतापूर प्रकल्प, राफेल विमानं आणि दहशतवादविरोधी लढ्यासंदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे पुढच्या महिन्यात बहुचर्चेत असलेले राफेल लढाऊ विमान भारतात दाखल होणार आहे. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅनुएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली.

भारताच्या मेक इन इंडियासाठी फ्रान्स भारताच्या सोबत आहे, असे इमॅनुएल मॅक्रॉन यावेळी म्हणाले. लवकरच म्हणजे पुढच्या महिन्यात फ्रान्स बनावटीचे राफेल हे लढाऊ विमान भारतात दाखल होणार आहे. या विमानामुळे भारताच्या वायुसेनेची ताकद वाढणार आहे. याआधी देखील फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्री जीन लेमोईन यांनी काही महिन्यांमध्ये भारतात राफेल लष्करी विमानाला पोहचवले जाणार आहे. १-१ करुन सर्व राफेल विमाने भारतात पोहचवली जाणार आहे, अशी माहिती दिली होती.

दरम्यान राफेल विमान हे भारतातील सर्वात गाजलेले प्रकरण आहे. राफेल विमान खरेदीवरून सत्तधारी भाजपला विरोधकांनी चांगलेचं धारेवर धरले होते. तर या व्यवहारात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या व्यवहाराची सर्वोच्च न्यायालयात अजूनही चौकशी सुरु आहे. मात्र याचं राफेल व्यवहाराबाबत कॅग रिपोर्टमध्ये भ्रष्टाचार झाला नसल्याचं नमूद केले आहे.