राफेलमुळे सुरक्षाव्यवस्था होईल भक्कम : हवाईदल प्रमुख

मोदी सरकारवर राफेल करारवरुन विरोधकांनी टीकेची झोड उटवली असतानाच हवाई दलाचे प्रमुख बी.एस. धनोआच्या यांनी सरकारची बाजू घेतली आहे. धनोआ यांनी म्हटेल की, ‘राफेल चांगल्या दर्जाचे विमान आहे. हे विमान जेव्हा उपखंडात येईल. तेव्हा ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राफेल विमान खरेदीचा करार हा सरकारने घेतलेला एक अत्यंत धाडसी निर्णय आहे. राफेल विमान आणि एस-400 एअर डिफेन्स प्रणालीमुळे भारतीय सुरक्षाव्यवस्था भक्कम होईल”

राफेल आणि एस-४०० एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम डील ही बूस्टर डोससारखा आहे. तसेच एस-४०० एअर डिफेन्स सिस्टम डीलला मंजुरी दिल्यानंतर ती विमाने २४ महिन्यात आम्हाला मिळतील असे धनोआ यावेळी म्हटले आहे.

” सुखोई विमानांच्या डिलिव्हरीमध्ये तीन वर्षे उशीर झाला . जग्वार या लढाऊ विमानाच्या डिलिव्हरीसाठी सहा वर्षे उशीर झालाय. एलसीएच्या डिलिव्हरीसाठी पाच वर्षे आणि मिराज २०००च्या डिलिव्हरीमध्ये दोन वर्षे उशीर झाला आहे,” अशी माहिती हवाई दलप्रमुख बी.एस. धनोआ यांनी म्हटले आहे.