राफेल विमानांचं भारतीय भूमीवर आगमन!

Rafeal

अंबाला: फ्रान्समधून पाच राफेल भारताच्या दिशेने रवाना झाली होती. जगातील आधुनिक विमानांमध्ये राफेलचा समावेश होतो. ही विमानं अंबाला येथे उतरल्यानंतर युद्धसज्ज ठेवली जाणार आहेत. राफेल विमानांसाठी वैमानिक तसेच ग्राउंड स्टाफचे तांत्रिक प्रशिक्षण झाले आहे.प्रशिक्षित टीम अंबालामध्ये विमानांचा ताबा घेणार आहे. तर सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ही विमाने सुरक्षित लँड झाल्याची माहिती ट्विट द्वारे दिली आहे.

ही पाच विमाने सात हजार किलोमीटरचा प्रवास करून अखेर भारतात दाखल झाले आहेत. अंबाला येथील भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात या राफेल विमानांचा समावेश करण्यात येणार आहे. ‘The Birds have landed safely in Ambala’, असं ट्वीट करत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानांनी अंबालामध्ये लॅण्डिंग केल्याची माहिती दिली. शिवाय राफेलच्या लॅण्डिंगचा व्हिडीओ देखील राजनाथ सिंह यांनी ट्वीट केलं आहे.

धक्कादायक: पीपीई किट बनवणाऱ्या कंपनीतील ४४ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

राफेल विमानांच्या पार्श्वभूमीवर अंबाला हवाई तळासाठी सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. तसेच, अंबाला हवाईतळाजवळील ३ किलोमीटरच्या परिसराला ड्रोन झोन घोषित करण्यात आले आहे. ३ किलोमीटरच्या आत ड्रोनवर पूर्णपणे बंदी घातली जाईल. जर कोणी त्याचे उल्लंघन केले तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.दरम्यान अंबाला एअरफोर्स स्टेशन परिसरात गर्दी होण्याच्या शक्यतेने हवाई दलाच्या विनंतीनंतर स्थानिक प्रशासनाने इथे कलम 144 (जमावबंदी) लावण्यात आलं आहे. याशिवाय फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफीवरही बंदी घालण्यात आली होती.

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या चुकीच्या निकालाबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कुलगुरूंना निवेदन

भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करतानाच दोन सुखोई-30 MKI या विमानांनी राफेलच्या तुकडीला एस्कॉर्ट केलं होतं. भारत सरकारने हवाई दलासाठी 36 राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी चार वर्षांपूर्वी फ्रान्ससोबत 59 हजार कोटी रुपयांचा करार केला होता.

‘राफेल गेमचेंजर ठरणार नाही, चीनची चिंता वाढेल असं वाटत नाही’