नडालची ‘अमेरिकन ओपन’च्या तिस-या फेरीत धडक

न्यूयॉर्क : अग्रमानांकित राफेल नडालने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली. शुक्रवारी आर्थर ॲश स्टेडियममध्ये झालेल्या दुस-या फेरीत नडालने यजमान अमेरिकेच्या टॅरो डॅनियल याचा ४-६, ६-३, ६-२, ६-२ असा पराभव केला.

पहिल्या सेटमध्ये नडालचा खेळात फार चुका झाल्या. त्यामुळे पहिला सेट त्याला गमवावा लागला. दुस-या सेटमध्येही सुरूवातीला नडालकडून चुका सुधारल्या गेल्या नव्हत्या, पण मोक्याच्या क्षणी गुण मिळवत नडालने दुसरा सेट जिंकला आणि सामन्यात पुनरागमन केले.

त्यानंतर मात्र, लय गवसलेल्या नडालने पुढील दोन्ही सेट सहज जिंकले आणि स्पर्धेच्या तिस-या फेरीत प्रवेश केला. हा नडालचा हंगामातील ५१वा विजय आहे. पुढील फेरीत शनिवारी नडालचा सामना अर्जेंटिनाचा लिओनार्डो मेयर याच्याशी होणार आहे.

Comments
Loading...