राफेलमध्ये घोटाळाचं, आम्ही आमच्या मुद्यावर ठाम : राहुल गांधी

congress-vp-rahul-gandhi-asks-pm-narendra-modi-speak-up-on-jai-shah-case

टीम महाराष्ट्र देशा : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राफेल विमान प्रकरणावरून मोदी सरकारला लक्ष केले आहे. राफेल करार हा चोरीचा मामला आहे. केंद्रीय दक्षता आयोगाकडून याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही आधीच केली आहे. माझ्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे,’ असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज स्पष्ट केलं.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण केले. यावेळी राष्ट्रपतींनी अभिभाषणात संरक्षण, शिक्षण, आरोग्य, अर्थव्यवस्था याविषयी विचार व्यक्त केले. तसेच भारताच्या शस्त्रसज्जतेवर भाष्य केलं होतं. ‘केंद्र सरकार देशाला संरक्षणसज्ज करण्यास कटिबद्ध आहे. लवकरच राफेल लढाऊ विमानं भारतीय संरक्षण दलाच्या ताफ्यात दाखल होतील’, असं ते म्हणाले होते. त्याबाबत राहुल गांधी यांना विचारलं असता, ‘या मुद्द्यावर माझी भूमिका बदलेली नाही. राफेल करारात भ्रष्टाचार झाला आहे, असं ते म्हणाले.

दरम्यान विरोधकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये राफेल प्रकरण उचलून धरले होते. तसेच याबाबत सर्वोच्च न्यायालयने देखील चौकशीचे आदेश दिले होते. मात्र विरोधकांच्या या मुद्याला जनतेने फारसे महत्व दिले नाही. तरी देखील कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राफेल च्या मुद्यावर ठाम आहेत.

 Loading…
Loading...