राफेल करार निश्चितच स्वस्त – अरुण जेटली

arun-jaitley 1

टीम महाराष्ट्र देशा : राफेल कराराने पुन्हा एकदा संसदेमध्ये पेट घेतला आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यामुळे संसदेमध्ये गदारोळ सुरु आहे. एका बाजूने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राफेल घोटाळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार ठरवलं आहे तर अरुण जेटली यांनी राफेल मध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

अरुण जेटली म्हणाले की , 2016 मध्ये दसॉल्ट कंपनीशी विमानांन बाबत करार केला होता. युपीए सरकार पेक्षा आम्ही विमानांची खरेदी स्वस्त दरात केली आहे,  आणि हे कॉंग्रेस चे  ए के अँटोनी देखील चांगल्या प्रकारे सांगू शकतील. तसेच विमान हे 9 ते 20 टक्क्यांनी स्वस्त खरेदी केले आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नाही. न्यायालयाने देखील विमानांच्या किंमती पहिल्या आहेत त्यामुळे न्यायालयाने देखील या करारात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नाही. म्हणजेच न्यायालयाची संतुष्टी झाली पण काँग्रेसला काही संतुष्टी मिळत नाही.

Loading...

तसेच गोव्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांची टेप खोटी आहे. त्यामुळेच राहुल गांधी घाबरत आहेत. काँग्रेस रकारला राफेल करार पूर्णत्वास नेता आला नाही. राहुल गांधी जे बोलत आहेत ते सर्व खोटे आहे. ते सर्वोच्च न्यायलायच्या विरुद्ध बोलत आहेत. ऑगस्टा वेस्टलँड, नॅशनल हेराल्ड, बोफोर्स या तिन्ही प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे नाव कसे आले असा प्रश्न अरुण जेटली यांनी उपस्थित केला. या तिन्ही प्रकारणावरून राहुल आणि सोनिया गांधी यांच्यावर जेटलींनी टीका केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी
'त्या' घटनेमुळे जितेंद्र आव्हाडांवर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल !