राफेल विमान लवकरच भारताच्या वायुदलात होणार दाखल : फ्रान्स

blank

टीम महाराष्ट्र देशा : फ्रान्स आणि भारत यांच्या मधील द्विपक्षीय संबंध सुधारवण्यासाठी फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन लेमोईन हे भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी भारताच्या लष्करात राफेल विमान लवकरच येणार आहे. अशी माहिती जीन लेमोईन यांनी दिली. काही महिन्यांमध्ये भारतात राफेल लष्करी विमानाला पोहचवले जाणार आहे. १-१ करुन सर्व राफेल विमाने भारतात पोहचवली जाणार आहेत, असे ते म्हणाले.

लेमोईन यांनी भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री वी. मुरलीधरन यांची भेट घेतली. त्यांनी या भेटीत भारत-फ्रान्सच्या राजकीय संबंध मजबूत करण्याबाबत चर्चा केली. त्यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचीही त्यांनी भेट घेतली. या भेटी नंतर लेमोईन पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात जी-७ शिखर परिषदेत भेट होईल. दोन्ही देशांतील करारांवर या भेटीत स्वाक्षऱ्या केल्या जाण्याची शक्यता आहे. फ्रान्स दहशतवाद्याच्या मुद्यावर नेहमी भारतासोबत उभा आहे. दहशतवाद हा प्रत्येक देशासाठी धोकादायक आहे.