भ्रष्टाचाराचे आरोप असलेले राधेश्याम मोपलवार पदच्युत

विरोधकांना हवा प्रकाश मेहतांचाही राजीनामा

मुंबई : भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना पदच्युत करण्यात आल आहे. मोपलवार यांना पदच्युत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. चौकशी होईपर्यंत ते या पदावर काम करू शकणार नसल्याचही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान भ्रष्टाचाराचे आरोप असलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

समुद्ध महामार्ग प्रकल्पाचे प्रमुख राधेश्याम मोपलवार यांची काही दिवसांपूर्वी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या आडिओमध्ये मोपलवार आणि एक मध्यस्थ यांच्यात एका इमारतीच्या बांधकामावरून सेटलमेंट सुरू होते. त्यानंतर याप्रकरणाचे पडसाद विधानसभेतही उमटले. विरोधकांनी मोपलवारांचे तातडीने निलंबन करण्याची मागणी करत विधानसभेत गोंधळ घातला होता. आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोपलवारांना चौकशी होईपर्यंत पदावरून दूर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

You might also like
Comments
Loading...