अखेर तो पोलीस ऑफिसर निलंबित

स्वयंमघोषित अध्यात्मिक गुरु राधे माँला दिल्ली येथील  विवेक विहार पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्याने स्वताची खूची बसण्यास दिली होती. याबरोबरच पोलीस ठाण्यात सत्संग देखील भरविला होता. हे प्रकरण मीडियासमोर आल्यानंतर सर्व स्तरातून या प्रकरणावर ठीका करण्यात आली.

याच ठीकेची दखल घेत पोलीस खात्याने पोलीस ठाण्याचा अधिकारी संजय शर्मा याला निलंबित केले आहे. संजय शर्मा बरोबरच आणखी एका पोलीस अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले आहे