मोदींच्या उपस्थितीत राधाकृष्ण विखेंचा भाजप प्रवेश ?

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. अहमदनगरमध्ये भाजपचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींची सभा होणार आहे. या सभेत विखेंचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.

राज्यातील कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असलेला दिसून येत आहे. विखे यांचे पुत्र यांना कॉंग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून राधाकृष्ण विखे हे कॉंग्रेसवर नाराज आहेत. जर विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केला तर कॉंग्रेसला हा खूप मोठा धक्का असणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राधाकृष्ण विखेंनी येत्या १५ दिवसात मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याची घोषणा केली होती त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाला पाठबळ मिळाले आहे.