fbpx

ब्रेकिंग : माझे वडील हयात नसताना पवारांकडून द्वेष, पक्ष श्रेष्ठींना भेटून निर्णय घेणार आहे – राधाकृष्ण विखे

मुंबई : माझे वडील हयात नसताना त्यांच्याबदलची टिप्पणी केली जात आहे. शरद पवारांचे असे विधान बरोबर नाही. आजोबा संदर्भात केलेल्या विधानावरून डॉ सुजयने केलेला निर्णय त्याच्यासाठी योग्य असेल. आघाडीला कोणतेही गालबोट लागले असे विधान मी केले नाही. मात्र शरद पवार यांच्याकडून केली जाणारी विधाने चुकीची असल्याचं, मत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

डॉ सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर वडील राधाकृष्ण विखे पाटील काही भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बुधवारी बोलताना त्यांनी आपण अद्याप राजीनामा दिला नसल्याचे सांगितले होते, तर सुजय यांच्या प्रवेशानंतर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर निशाना साधला होता. आज बोलताना राधाकृष्ण विखे यांनी पक्ष श्रेष्ठींना भेटून निर्णय घेणार असल्याचं सांगितले आहे.

अहमदनगर लोकसभे संदर्भात निर्माण झालेचं चित्र माझ्या मुलाच्या उमेदवारीवरून झाल्याची चर्चा केली जात आहे. नगरच्या जागेवर लागोपाठ तीनवेळा राष्ट्रवादीचा उमेदवार पराभूत झाला होता, तसेच कॉंग्रेसला विजयी होण्याची शक्यता असल्याने नगरची मागणी करण्यात येत होती. योग्य समन्वय घडवण्याचा आमचा प्रयत्न होता. असा दावा देखील विखे पाटील यांनी केला आहे.

राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे 

– पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य, सुजयचा निर्णय वैयक्तिक होता : राधाकृष्ण विखे पाटील

– पवारांच्या मनात विखेंबद्दल अजूनही द्वेष, पवारांच्या वक्तव्याने वेदना : राधाकृष्ण विखे पाटील

-औरंगाबाद आणि अहमदनगरच्या जागेच्या बाबतीत समन्वय साधण्याचा प्रयत्न होता : राधाकृष्ण विखे पाटील

– अहमदनगरमध्ये मी कोणाच्याच प्रचाराला जाणार नाही : राधाकृष्ण विखे पाटील

– मला जे सांगायचं ते मी हायकमांडला सांगीन.. थोरात इतके मोठे आहेत का हायकमांड पेक्षा.. मी त्यांना सांगण्यास बांधील नाही : राधाकृष्ण विखे पाटील

– दोन्ही जागा काँग्रेसला मिळाल्या असत्या, तर गैर काय? अनेक ठिकाणी एकाच जिल्ह्यातील दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे आहेत : राधाकृष्ण विखे पाटील

– सुजयने त्याचा निर्णय घेतला.. विरोधी पक्ष म्हणून माझी जबाबदारी होती, गालबोट लागेल अस विधान माझ्याकडून होणार नाही याची काळजी मी घेतली.. आघाडी धर्म पाळला

– पवार साहेबांनी आमचे वडील बाळाकृष्ण विखे पाटलांबाबत केलेलं वक्तव्य दुर्दैवी : राधाकृष्ण विखे पाटील

-आघाडीचा धर्म पाळताना हयात नसलेल्या व्यक्तीबद्दल टिप्पणी करणं पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला कितपत शोभनीय आहे? : राधाकृष्ण विखे पाटील

– 2004, 2009 आणि 2014मध्ये राष्ट्रवादी नगरच्या जागेवर हरले होते , ती जागा आम्ही जिंकू शकतो ,जास्तीत जास्त जागा वाढवण्याचा प्रयत्न होता

1 Comment

Click here to post a comment