बाळासाहेब थोरातांनी पक्षनिष्टा शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील याचं थोरातांना प्रत्युत्तर

vikhe patil and balasaheb thorat

मुंबई: डॉ सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर निशाना साधला होता. तर थोरात हे पक्षश्रेष्ठींपेक्षा मोठे नाहीत, त्यांनी मला पक्षनिष्टा शिकवू नये, असे प्रत्युत्तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे.

माझे वडील हयात नसताना त्यांच्याबदलची टिप्पणी केली जात आहे. शरद पवारांचे असे विधान बरोबर नाही. आजोबा संदर्भात केलेल्या विधानावरून डॉ सुजयने केलेला निर्णय त्याच्यासाठी योग्य असेल. आघाडीला कोणतेही गालबोट लागले असे विधान मी केले नाही. मात्र शरद पवार यांच्याकडून केली जाणारी विधाने चुकीची असल्याचं, मत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, माझे वडील ह्यात नसताना त्यांच्याबद्दल एवढा द्वेष व्यक्त केला जात आहे. त्यामुळे नगरमध्ये राष्ट्रावादी उमेदवाराचा प्रचार करणार नाही. तसेच प्रचारासाठी मतदारसंघातच जाणार नसल्याचं विखे पाटील म्हणाले आहेत.

नेमक काय म्हणाले होते बाळासाहेब थोरात

आजवर कायम कॉंग्रेस अडचणीत असताना विखे परिवाराने दगाफटका केला आहे. मध्यंतरी विखे पिता-पुत्र शिवसेनेतही गेले. शिवसेनेतून पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतरही त्यांना पक्षाने मंत्रिपद दिले. आता सुजय हे भाजपात गेले. आपल्या मुलाचा हा बालहट्ट राधाकृष्ण विखे यांनी थांबवायला हवा होता. असा घणाघात कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.