शेतीमालाला हमीभाव देण्याचे शासनाचे धोरण नाही – राधाकृष्ण विखे

अहमदनगर / प्रशांत झावरे : सरकार शेतकऱ्यांनाच्या मुळावर उठले असून कोणत्याही शेतीमालाला हमीभावाचे संरक्षण देण्याचा शासनाचा कोणताही निर्णय किंवा धोरण नसून यामुळे शेतकरी बरबाद होईल असा घणाघात महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे यांनी सरकारी धोरणावर केला. शिर्डी मधील शिंगवे गावी कै.नामदेवराव परजणे पाटील गोदावरी सहकारी दूध उत्पादक संघाच्या सहकार्याने बालाजी सहकारी दूध उत्पादक संस्थेने सुरू केलेल्या बल्क कुलर व्यवस्थेचे उदघाटन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले त्यावेळी ते बोलत होते.

विखे पाटील पुढे म्हणाले की, हे सरकार केवळ ३ रुपये अनुदान दूध भूकटीला देणार आहे, परंतु त्याने दूध उत्पादकांचा प्रश्न सुटणार नसून दुधालाच १० रुपये अनुदान देऊन ते दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले पाहिजे. तसेच परराज्यातून होणारी दुधाची खरेदी तात्काळ बंद करून तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असेही विखे पाटील म्हणाले.

विखे पाटलांनी आपल्या खास शैलीत सरकारवर हल्लाबोल करताना सरकार देत असलेले अनुदान म्हणजे उपकार नसून ते त्यांचे आद्य कर्तव्य आहे, तसेच सरकारने सहकारी संस्थांना बंधने घालण्याचे पाप करू नये. सहकारी संस्था म्हणजे शेतकऱ्यांच्या कामधेनू असून त्यावरच गेली कित्येक वर्षे सामान्य शेतकरी आपल्या संसारात उभा असल्याचे विखे पाटील म्हणाले.

Rohan Deshmukh

शेती व्यवसायातील जोडधंदा म्हणून दूध धंद्याकडे पाहिले जात असून ग्रामीण भागाचा हा आत्मा आहे, यात जरी स्पर्धा वाढली तरी यातून लाखो कुटुंबांचा उदरनिर्वाह होत आहे, माणस स्वतःच्या पायावर उभी राहत आहे. दुधाला २७ रुपये भाव मिळायलाच हवा. नाहीतर मध्यंतरीच्या काळात याच धंद्यात भेसळ करणारे वाढले होते त्यामुळे दूध धंदा बदनाम झाला होता हे सगळे पाप सरकारच्या आकार्यक्षमतेचे असून यावर मार्ग काढणे सरकारचे आद्यकर्तव्य असल्याचा पुनरुच्चार विखे पाटलांनी केला.

दुधाचा पोषण आहारात समावेश करण्यात आला तर अंगणवाड्यांमधील मुलांना शुद्ध दूध मिळेल यामुळे दूध धंदा अधिक तेजीत होईल. तसेच या धंद्याला आवश्यक तंत्रज्ञान विकसित करून दिले तर स्पर्धेच्या काळात हा धंदा खूप पुढे जाऊन सामान्य शेतकरी मोठा झाल्याशिवाय राहणार नाही. आज कर्जमाफीनंतरपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नसून पंतप्रधान दत्तक ग्राम मधील शेतकरी पण आत्महत्या करत असल्याने हे सरकारचे फार मोठे अपयश आहे.

तसेच सहकारी साखर कारखानदारी पण सरकारने अडचणीत आणली असून साखर उत्पादनात अग्रेसर असूनही पाकिस्तानी साखर आणून शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट घेण्याचे पाप सरकार करीत असून याचा हिशेब येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात विखे यांनी यावेळी सरकारवर केला.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...