सामान्य माणसाचा सरकारला विसर- राधाकृष्ण विखे पाटील

“सामान्य माणसाचा सरकारला विसर पडला आहे, तर राज्य आणि केंद्रातील सरकार श्रीमंतासाठी काम करीत असून सत्तेवर राहण्यासाठी ते ‘काबिल’ नाही अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी  केली.

“राज्यात भाजपा-शिवसेनेची ‘दंगल’ सुरू असून, त्यांच्या पक्षातील नेत्यांना ‘व्हेंटिलेटर’वर पाठवण्याची वेळ आली आहे.”, असेही विखे म्हणाले.

जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत जनता सरकारला ‘व्हेंटिलेटर’वर पाठवेल, अशी फिल्मी स्टाईल टीका  विखे पाटील यांनी शिर्डी येथे  केली.