fbpx

१५ दिवसात मोठा निर्णय घेणार : राधाकृष्ण विखे पाटलांचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येत्या १५ दिवसांत मोठा राजकीय निर्णय घेणार आहे असं विधान केलं आहे. राधाकृष्ण विखे यांना आपल्या मुलासाठी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यात अपयश आले आहे. त्यामुळे ते कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याचं चित्र आहे. त्यामुळे ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपतर्फे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ते मुलाप्रमाणेचं भाजपमध्ये जाणार का ? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे. सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर शिवसेनेकडून राधाकृष्ण विखेंना ऑफर आली होती. त्यामुळे ते शिवसेनेत प्रवेश करतील का? अशाही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

राधाकृष्ण विखे जो काही निर्णय घेतील त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होईल यात शंका नाही. विखेंनी केलेल्या या विधानामुळे ते नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.