दुष्काळावरून कोणीही राजकारण करू नये – विखे पाटील

Radha-krushna vikhe patil

टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे माजी विरोधीपक्षनेते आणि कॉंग्रेसमध्ये नाराज असलेले नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली आहे. त्यामुळे पुत्र सुजय विखे पाठोपाठ भाजपवासी होणार असल्याच्या चर्चांना उधान आले आहे. दरम्यान हि भेट राजकीय नसल्याचं विखे पाटील यांनी सांगितले आहे.

Loading...

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये शासकीय पातळीवर योजना सुरु आहेत, सरकारमधील मंत्री आणि विरोधी पक्षातील नेते दुष्काळी दौरे करत आहेत. मात्र दुष्काळावरून कोणीही राजकारण करू नये, असा सल्ला विखे पाटील यांनी दिला आहे. महाजन यांच्याशी अहमदनगर जिल्ह्यातील पाण्यासंदर्भात देखील चर्चा झाल्याचं विखे पाटील यांनी यावेळी सांगितल आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसने जागा न सोडल्याने सुजय विखे यांनी आघाडीत बंडखोरी करत भाजप प्रवेश केला होता, भाजपकडून त्यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. सुजय यांच्या प्रवेशात गिरीश महाजन यांनीच पुढाकार घेतला होता. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विखे – महाजन भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.Loading…


Loading…

Loading...